Long-Lost Siblings Reunite After 75 Years: देशाच्या फाळणीने बहिण-भावाला वेगळे केले, आता सोशल मीडियाद्वारे 75 वर्षांनंतर झाली भावंडांची भेट (Watch)
अझीझ पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले तर, कुटुंबातील इतर सदस्य भारतातच राहिले. शेख अब्दुल अजीज सांगतात की, 75 वर्षांपूर्वी कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे दुःखात व्यतीत केली.
भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान एकमेकांपासून विभक्त झालेले बहिण-भाऊ ऐतिहासिक करतारपूर कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकत्र आले. दोघांची ही भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य झाली. सोमवारी प्रसारमाध्यमांकडून ही माहिती मिळाली. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील 81 वर्षीय महेंद्र कौर यांनी कर्तारपूर कॉरिडॉर येथे पाकव्याप्त काश्मीरमधील आपला 78 वर्षीय भाऊ शेख अब्दुल अझीझ याची भेट घेतली. 75 वर्षांपूर्वी फाळणीच्या वेळी विभक्त झालेले हे भावंडे होते.
फाळणीदरम्यान, सरदार भजनसिंग यांचे कुटुंब पंजाबच्या भारतीय भागातून वेगळे झाले होते. अझीझ पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले तर, कुटुंबातील इतर सदस्य भारतातच राहिले. शेख अब्दुल अजीज सांगतात की, 75 वर्षांपूर्वी कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे दुःखात व्यतीत केली. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कोणीही सापडले नाही. आता सोशल मिडिया पोस्टद्वारे त्यांची त्यांच्या बहिणीशी भेट झाली आहे. (हेही वाचा: Viral Video: धार्मिक गाण्यावर हरणाच्या पिल्लाचा थिरकताना व्हिडिओ व्हायरल, पहा पोस्ट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)