Lok Sabha Election 2024 Voting: 'EVM वर कमळ चं चिन्हच दिसत नाही' म्हणत पुण्यात धायरीतील आजोबा संतापले (Watch Viral Video)

भाजपच्या पारंपरिक मतदार संघात यंदा भाजपाचा उमेदवार नसल्याने आजोबांनी राग व्यक्त केल्याचा हा एक प्रकार मतदान केंद्रातून समोर आला आहे.

Pune Viral Video | Twitter

लोकसभा मतदानासाठी आज तिसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर रांगा पहायला मिळत आहे. अशात पुण्यामध्ये एक आजोबा 'EVM वर कमळ चं चिन्हच दिसत नाही' म्हणत संतापल्याचा व्हीडिओ वायरल होत आहे. हे पुण्यातील धायरीतील आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात महायुती कडून सुनेत्रा पवार 'घड्याळ' तर मविआ कडून सुप्रिया सुळे 'तुतारी फुंकणार्‍या माणसाच्या' चिन्हावर निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. भाजपच्या पारंपरिक मतदार संघात यंदा भाजपाचा उमेदवार नसल्याने आजोबांनी राग व्यक्त केल्याचा हा एक प्रकार मतदान केंद्रातून समोर आला आहे.

पुण्यात भडकलेल्या आजोबांचा व्हिडिओ वायरल  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now