Viral Video : जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. सिंहिणीनं (Lioness )घरात घुसून एका पाळीव कुत्र्याची शिकार(Dog) केली. सिंहणीला अडवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्नही केल्याचं व्हिडीओमधून दिसत आहे. मात्र, सिंहणीने त्याला दाद नाही दिली. ती कुत्र्याला सोडण्याला तयार नव्हती. animalsvault नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समज शकलेले नाही. (हेही वाचा : Viral Video: चालत्या रेल्वे मध्ये चढतांना महिलेचा आणि मुलाचा गेला तोल, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)

 

View this post on Instagram

 

A post shared by Wild Animals (@animalsvault)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)