Karnataka Building Collapse: कोलारच्या बांगारापेट शहरात नूतनीकरणादरम्यान 3 मजली इमारत कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
इमारतीच्या तळमजल्यात नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्या दरम्यान इमारत कोसळली.
Karnataka Building Collapse: कोलार जिल्ह्यातील बंगारापेट शहरातील दांडू रोडजवळ शुक्रवारी तीन मजली इमारत कोसळल्याची घटना (Karnataka building collapse) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुमार यांच्या मालकीची ही तीन मजली इमारत होती. तळमजल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. इमारतीतील तीन कुटुंबांना बाहेर काढण्यात आले आहे. इमारत कोसळल्यामुळे परिसरातील खाजगी शाळेच्या कंपाऊंडचे नुकसान झाले आहे. व्हिडीओत दिसत असलेल्या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते की, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत केसळते. ज्यामुळे तेथे धुराचे साम्राज्य पहायला मिळते. (Viral Video: चाहत्याने हातावर काढला हार्दिक पांड्याने दिलेल्या ऑटोग्राफचा टॅटू, व्हिडीओ व्हायरल)
कोलारच्या बांगारापेट शहरात नूतनीकरणादरम्यान 3 मजली इमारत कोसळली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)