Iran: हिजाबशिवाय फोटो काढल्यामुळे मौलवी सोबत वाद, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
मौलवीने त्या महिलेचा हॉस्पिटलमध्ये हिजाबशिवाय फोटो काढला, जाणून घ्या काय झाले पुढे
Iran: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक इराणी महिला एका मौलवीसोबत भांडत असल्याचे दिसून येत आहे. मौलवीने त्या महिलेचा हॉस्पिटलमध्ये हिजाबशिवाय फोटो काढला. विओन न्यूजच्या वृत्तानुसार, ही घटना क्यूम क्लिनिकमध्ये घडली जिथे महिला आपल्या मुलासह आली होती. रिपोर्टनुसार, हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जात असताना महिलेचा हिजाब घसरला.
हिजाब घातला नसल्यामुळे मौलवी तिचे फोटो काढताना पाहून महिलेला धक्काच बसला. जेव्हा त्या महिलेला कळले की मौलवी या घटनेची तक्रार पोलिसांकडे करेल, तेव्हा तिने मौलवीशी भांडण्यास सुरुवात केली आणि त्याला काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगितले. मात्र, मौलवीने तिला नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हे लक्षात घेतले पाहिजे की, इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब किंवा डोक्यावर स्कार्फ घालणे महिलांसाठी अनिवार्य आहे.
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)