Human Pyramid on Bike in Uttar Pradesh: एका दुचाकीवर बसले चक्क सात तरुण; रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास, व्हिडिओ व्हायरल (Watch)

आश्चर्याची बाब म्हणजे सातव्या तरुणाला दुचाकीवर बसण्यासाठी जागा न मिळाल्याने मागे बसलेल्या एका तरुणाने त्याला खांद्यावर घेतले आहे.

Human Pyramid on Bike

आजकाल रील बनवण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, तरुणाई यासाठी कोणतेही धाडस करायला तयार आहे. यासाठी अनेकजण आपला जीवही धोक्यात घालत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये तरुणांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. याठिकाणी एक-दोन नव्हे तर चक्क सात युवक एका चालत्या दुचाकीवर बसलेले दिसून आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सातव्या तरुणाला दुचाकीवर बसण्यासाठी जागा न मिळाल्याने मागे बसलेल्या एका तरुणाने त्याला खांद्यावर घेतले आहे. तरुणांच्या या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोक सुरक्षेवर आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. हा व्हिडीओ हापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील काठीखेडा येथील आहे. (हेही वाचा: Girls Fighting Video: सेम ड्रेस वरून 2 मुली एकमेकींना भिडल्या (Watch Video)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement