Gujarat Shocker: वलसाडमध्ये महिला प्रवाशाचा ऑटो चालकाकडून विनयभंग; उघडली पँटची झिप, असभ्य भाषेचा वापर (Watch Video)

आरोपी ऑटोरिक्षा चालकाने महिलेसमोर त्याच्या पँटची झिप उघडायला सुरुवात केली तसेच अतिशय असभ्य भाषेचा वापर केला.

Arrest (PC -Pixabay)

वलसाड पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला त्याच्या रिक्षात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. वृत्तानुसार, एका क्षुल्लक मुद्द्यावरून वाद वाढला आणि आरोपीने प्रवासी महिलेशी अयोग्य वर्तन करायला सुरुवात केली. आरोपी ऑटोरिक्षा चालकाने महिलेसमोर त्याच्या पँटची झिप उघडायला सुरुवात केली तसेच अतिशय असभ्य भाषेचा वापर केला. महिलेने याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ सय्यद असे आरोपीचे नाव आहे. नंतर त्याला महिलेची माफी मागायला लावली. (हेही वाचा: टीडी कॉलेजच्या प्राध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थ्यावर केले लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल, आरोपीला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement