Gauri More Video: इन्फ्लुएन्सर गौरी मोरेची बाईक पोलिसांनी अडवली; नेमकं प्रकरण काय?

गिरगाव येथील गुढीपाडवा शोभायात्रेदरम्यान इन्फ्लुएन्सर गौरी मोरेला मुंबई पोलिसांनी थांबवून कडक शब्दांत सुनावले. बाईकचा कर्कश आवाज आणि गर्दीतील स्टंटबाजीमुळे ही कारवाई करण्यात आली.

(Photo Credits: Instagram/Aamchi Mumbai)

मुंबई: मुंबईतील गिरगाव भागात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या पारंपरिक शोभायात्रेत शुक्रवारी एक खळबळजनक प्रकार समोर आला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गौरी मोरे, जी तिच्या खास 'पाडवा लूक'साठी प्रसिद्ध आहे, तिला मुंबई पोलिसांनी भररस्त्यात थांबवून चांगलेच सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आमची मुंबई' या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गौरी मोरे एका 'कावासाकी निन्जा H2' (Kawasaki H2) या महागड्या स्पोर्ट्स बाईकवर बसलेली दिसत आहे. शोभायात्रेच्या गर्दीत बाईकचे सायलेन्सर मोठ्याने वाजवणे (Revving) आणि कर्कश आवाजामुळे तिथल्या शांततेचा भंग होत होता. हे पाहून कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ हस्तक्षेप केला आणि बाईक थांबवून गौरीला जाब विचारला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamchi Mumbai | Rutvik Redkar (@_aamchi_mumbai_)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement