Fact Check: आधार कार्डची झेरॉक्स प्रत शेअर न करण्याचा सरकारचा सल्ला? UIDAI ने केला Fake Viral Message चा पर्दाफाश

समस्या टाळण्यासाठी सरकारने वापरकर्त्यांना मास्क केलेले आधार कार्ड वापरण्यास सांगितले आहे.

Aadhaar Card (Photo Credits: PTI)

मंगळवारी युआयडीएआय (UIDAI) ने एका बनावट संदेशाचा पर्दाफाश केला. या संदेशामध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारने आधार कार्डधारकांना आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती कोणाशीही शेअर करू नयेत असा इशारा दिला आहे. संदेशामध्ये म्हटले आहे की, लोकांना त्यांच्या आधारच्या फोटोकॉपी कोणत्याही संस्थेसोबत शेअर करू नका, कारण त्यांचा गैरवापर होऊ शकतो असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे. या ऐवजी समस्या टाळण्यासाठी सरकारने वापरकर्त्यांना मास्क केलेले आधार कार्ड वापरण्यास सांगितले आहे. हे मास्क आधार कार्ड कसे प्राप्त करायचे हे देखील या संदेशामध्ये नमूद केले आहे. मात्र आता युआयडीएआयने हा संदेश पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement