Fact Check: सरकार खात्यात जमा करणार 30 लाख रुपये; सोशल मिडियावर Fake News व्हायरल, जाणून घ्या सत्य

अशी कोणतीही योजना आपल्या बाजूने चालवली जात नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून (ऑनलाइन फसवणूक) सावध रहा

Fake News (Photo Credits: File Image)

सोशल मीडियावर एक निवेदन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका योजनेमध्ये अर्जदारांच्या खात्यात सरकार 30 लाख रुपये जमा करणार असल्याचा दावा या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. मात्र यासाठी अर्जदाराला 10,100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे, असेही यात नमूद केले आहे. हे निवेदन भारत सरकारकडून जारी केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर, सरकारने हे पत्र आणि त्यात नमूद केलेली योजना फेटाळून लावली असून ते बनावट पत्र असल्याचे म्हटले आहे.

अशी कोणतीही योजना आपल्या बाजूने चालवली जात नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून (ऑनलाइन फसवणूक) सावध रहा आणि अर्जाच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. या व्हायरल पत्राची सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) चौकशी केली आहे. पीआयबीने म्हटले आहे की, भारत सरकारच्या नावाने एक पत्र सोशल मीडियावर फिरत आहे ज्यामध्ये लाभार्थीला 30 लाख रुपये देण्याबद्दल भाष्य केले आहे. फसवणूक करणारे हे लोक सरकारी संस्थांच्या नावाने फसवणूक करत आहेत. अशा कोणत्याही पत्राबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे पत्र बनावट असल्याचे सांगत सरकारने अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement