जापानी मुलीने गायले Ekati Ekati Ghabarlis गाणे, पुणे येथील व्हिडिओ सलील कुलकर्णी यांनी केला पोस्ट
पुण्यात एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात हे गाणे तिने गायले. गायक सलील कुलकर्णी यांनी याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
चिंटू चित्रपटातील " एकटी एकटी घाबरलीस ना ?" हे गाणे एका जापानी मुलीने गायले आहे. पुण्यात एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात हे गाणे तिने गायले. गायक सलील कुलकर्णी यांनी याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. Rotary Exchange Program च्या माध्यमातून पुण्यात आलेली ही मुलगी आणि पुण्यातल्या शीला कोपर्डे ( करिश्मा सोसायटी ) ह्यांनी तिला हे गाणं शिकवलं, असे कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करताना म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)