Bill Gates Drives E-Autorickshaw: बिल गेट्सने चालवली ई-ऑटोरिक्षा; Anand Mahindra यांनी दिलं मायक्रोसॉफ्टच्या संस्थापकांना थ्री-व्हीलर ईव्ही ड्रॅग रेससाठी आव्हान, Watch Video
बिल गेट्स यांनी महिंद्रा अँड महिंद्राची शक्तिशाली इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा महिंद्रा ट्रेओ चालविली आहे. ज्याचा एक व्हिडिओ ब्रँडचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
Bill Gates Drives E-Autorickshaw: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारपासून बड्या दिग्गजांपर्यंत ते या दिशेने सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील एक असलेल्या बिल गेट्स यांनी महिंद्रा अँड महिंद्राची शक्तिशाली इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा महिंद्रा ट्रेओ चालविली आहे. ज्याचा एक व्हिडिओ ब्रँडचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून लोक सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्वीअरमध्ये बिल गेट्सचा इलेक्ट्रिक ऑटो चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "चलती का नाम बिल गेट्स की गाडी, बिल गेट्सला 3 व्हिलर चालवताना पाहून खूप आनंद झाला. आता तुमच्या पुढील ट्रिप अजेंडासाठी बिल गेट्स, सचिन तेंडुलकर आणि माझ्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रायसायकल ड्रॅग रेस असावी." आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला लोकांना खूप पसंती मिळत आहे. यूजर्स सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.