'Driverless Car' in Pune: गाडीत चालक नसताना पुणे महानगरपालिकेचा रोड मेंटेनन्स टेम्पो रिव्हर्समध्ये सुसाट; समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch)

व्हायरल क्लिपमध्ये वाहनाच्या चालक सीटवर कोणीच नसल्याचे दिसत आहे. अशात टेम्पो रिव्हर्स वेगाने जात आहे. काही वेळाने हा टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर आदळतो.

'Driverless Car' in Pune

'Driverless Car' in Pune: गेल्या काही दिवसांपासून पुणे अनेक अपघातांमुळे सतत चर्चेत आहे. आता पुण्यातून अजून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका वर्दळीच्या महामार्गावर एक टेम्पो, चक्क चालक नसताना रिव्हर्समध्ये भरधाव जाताना दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही कथित घटना रविवारी, 4 ऑगस्ट रोजी पुण्यातील हडपसर येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.  येथील वैदूवाडी उड्डाणपुलावर रविवारी रात्री 11.45 च्या सुमारास हा प्रकार समोर आला. सुदैवाने मागून कोणतेही वाहन आले नसल्याने अनर्थ टळला.

व्हायरल क्लिपमध्ये वाहनाच्या चालक सीटवर कोणीच नसल्याचे दिसत आहे. अशात टेम्पो रिव्हर्स वेगाने जात आहे. काही वेळाने हा टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर आदळतो. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही, मात्र असल्या भयानक प्रकारामुळे पुण्यातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे. हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचे रोड मेंटेनन्स वाहन आहे. (हेही वाचा: Snake Rescue Video: कोब्राला पकडताना प्राण्याने दंश केल्याने सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now