'Driverless Car' in Pune: गाडीत चालक नसताना पुणे महानगरपालिकेचा रोड मेंटेनन्स टेम्पो रिव्हर्समध्ये सुसाट; समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch)
व्हायरल क्लिपमध्ये वाहनाच्या चालक सीटवर कोणीच नसल्याचे दिसत आहे. अशात टेम्पो रिव्हर्स वेगाने जात आहे. काही वेळाने हा टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर आदळतो.
'Driverless Car' in Pune: गेल्या काही दिवसांपासून पुणे अनेक अपघातांमुळे सतत चर्चेत आहे. आता पुण्यातून अजून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका वर्दळीच्या महामार्गावर एक टेम्पो, चक्क चालक नसताना रिव्हर्समध्ये भरधाव जाताना दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही कथित घटना रविवारी, 4 ऑगस्ट रोजी पुण्यातील हडपसर येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील वैदूवाडी उड्डाणपुलावर रविवारी रात्री 11.45 च्या सुमारास हा प्रकार समोर आला. सुदैवाने मागून कोणतेही वाहन आले नसल्याने अनर्थ टळला.
व्हायरल क्लिपमध्ये वाहनाच्या चालक सीटवर कोणीच नसल्याचे दिसत आहे. अशात टेम्पो रिव्हर्स वेगाने जात आहे. काही वेळाने हा टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर आदळतो. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही, मात्र असल्या भयानक प्रकारामुळे पुण्यातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे. हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचे रोड मेंटेनन्स वाहन आहे. (हेही वाचा: Snake Rescue Video: कोब्राला पकडताना प्राण्याने दंश केल्याने सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)
पहा व्हिडिओ-
एकीकडे पुण्यातील रस्त्यांची झालेली अवस्था आणि दुसरीकडे महापालिकेच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्ती विभागाचा हा टेम्पो.. ड्रायव्हर नसतानाही रिव्हर्सने जोरात पाठीमागे जाताना दिसतोय..अत्यंत भयानक आणि जिवेघेणा असा हा व्हिडिओ
वेळ- रविवारी रात्री ११.४५ @PMCPune pic.twitter.com/EmbVUAsKW8
— Archana More-Patil (@Archana_Scoope) August 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2024 10:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

