Viral Video: फरिदाबादमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरू असताना चालकाने इन्स्पेक्टरला गाडीतून ओढत नेले; पहा धक्कादायक व्हिडिओ
वादानंतर चालकाने आपली कार भरधाव वेगाने चालवली. तसेच वाहनाचे कागदपत्र मागणाऱ्या इन्स्पेक्टरला कारसह ओढत नेले.
Viral Video: फरीदाबादच्या बल्लभगडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅफिक सिग्नल (Traffic Signal) लाल झाल्यावर एका वाहतूक पोलिस निरीक्षकाने वाहनाची कागदपत्रे मागितली असता, चालकाने अधिकाऱ्याला काही मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. वादानंतर चालकाने आपली कार भरधाव वेगाने चालवली. तसेच वाहनाचे कागदपत्र मागणाऱ्या इन्स्पेक्टरला कारसह ओढत नेले. या घटनेत पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)