Dolphin Spotted at Bandra and Juhu Beach: मुंबईतील वांद्रे आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावर दिसले डॉल्फिन; पाण्यात उडी मारतानाचा मोहक व्हिडिओ व्हायरल (Watch Videos)
सोशल मीडिया पोस्टनुसार ही घटना जुहू बीचवर घडल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ नक्की कधी शूट केला याची तारीख आणि वेळ अद्याप अज्ञात नाही.
Dolphin Spotted at Juhu Beach: मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन दिसल्याची एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. सोशल मिडियावर याचा मोहक व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये डॉल्फिन समुद्राच्या पाण्यात उडी मारताना दिसत आहे. सोशल मीडिया पोस्टनुसार ही घटना जुहू बीचवर घडल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ नक्की कधी शूट केला याची तारीख आणि वेळ अद्याप अज्ञात नाही. दुसरीकडे, मुंबईतील वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यावरही असाच एक डॉल्फिन दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शनिवारी सोशल मीडियावर हे दोन्ही व्हिडिओ समोर आले. मुंबईमध्ये डॉल्फिन दिसण्याचा संबंध अरबी समुद्रातील भरती-ओहोटीशी जोडला जात आहे. जून ते सप्टेंबर असे सुमारे 22 दिवस मुंबईत भरती-ओहोटी राहील असे वृत्त आहे. यावेळी समुद्राची पातळी 4.5 मीटरने वाढेल असा दावा केला जात आहे. (हेही वाचा: Viral Video: माकडाने माणसाच्या कानात हळूवारपणे काहीतरी सांगितले, त्यांच्या संभाषणाचा मजेदार व्हिडिओ व्हायरल)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)