Viral Video: श्वानाने केली अंध व्यक्तीला मदत, व्हायरल व्हिडिओचे नेटकऱ्यांकडून होतयं कौतुक

प्राणी देखील दयाळूपणाने वागू शकतात. जेव्हा आपण दयाळू प्राण्यांबद्दल बोलतो तेव्हा लगेच प्रत्येकाच्या मनात कुत्रा येतो.

Dog

दयाळूपणा आणि करुणा माणसांमध्ये असते असे नाही. असे गुण फक्त माणसातच आढळतात असे नाही. प्राणी देखील दयाळूपणाने वागू शकतात. जेव्हा आपण दयाळू प्राण्यांबद्दल बोलतो तेव्हा लगेच प्रत्येकाच्या मनात कुत्रा येतो. कुत्र्यासाठी, प्रेम आणि निष्ठा ही दोन सर्वात महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. याचेच एक धक्कादायक उदाहरण इंटरनेटवर व्हायरल झाले. एका व्यक्तीने त्याच्या ट्विटर पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक अंध व्यक्ती रस्त्याने चालताना दिसत आहे. मात्र वाटेतच एक मोठा खड्डा आहे. तो समोरून येणाऱ्या श्वानाला दिसतो. तसेच तो त्या व्यक्तीची मदत करायला पुढे सरसावतो. त्या अंध व्यक्तीची काठी तोंडात धरून रस्ता पार करण्यास त्याला मदत करतो. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement