Divorce: ऐकावे ते नवलंच! 25 वर्षीय महिलेने केले स्वतःशी लग्न; अवघ्या 24 तासांत घटस्फोटाची घोषणा

अवघे 24 तास स्वतःच्या कंपनीसोबत व्यतीत केल्यानंतर या महिलेने घटस्फोटाची कारवाई सुरु केली.

Sofi Maure

जगात दररोज अनेक चित्र-विचित्र घटना घडत असतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आताही अशीच एक बाब समोर आली आहे. एका महिलेने स्वत:शी लग्न केल्याची बातमी समोर आली होती. ही गोष्ट लोकांच्या पचनी पडतेय न पडतेय तोपर्यंतच या महिलेने आपण स्वतःशी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. अवघे 24 तास स्वतःच्या कंपनीसोबत व्यतीत केल्यानंतर या महिलेने घटस्फोटाची कारवाई सुरु केली. सोफी मौउरे (Sofi Maure) असे या महिलेचे नाव असून ती 25 वर्षांची आहे. सोफीचे ट्विटर आणि इंस्टाग्रामवर 500,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याआधी सोफीने सांगितले होते की, तिने स्वतःशी लग्न करण्यासाठी लग्नाचा पोशाखदेखील खरेदी केला होता. आता लग्नाच्या एका दिवसानंतर सोफीने आपण स्वतःशी घटस्फोट घेत असल्याचे सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)