Alstravage नावाच्या युजर्संने बेघर गर्भवती स्त्रीवर बनवला घृणास्पद रील; नेटीझन्सनी केली संबंधित व्यक्तिला अटक करण्याची मागणी
"इन्स्टाग्राम कृपया हे रील काढून टाका. ही हसण्याची बाब नाही!!" तिने दिल्ली पोलिस आणि राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्या इन्स्टग्रामवर एक घृणास्पद रील व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अल्स्ट्रावेज उर्फ एएल टेट म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती चालताना दिसत आहे. या व्हिडिओवर त्याने लिहिलेले आहे की, "मी एका बेघर महिलेला गर्भधारणा केल्यावर तिच्या पोटात काहीतरी असू शकते." घृणास्पद आणि निंदनीय व्हिडिओवर ट्विटर यूजर्संनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दिव्या गंडोत्रा तांडो या ट्विटर वापरकर्त्याने या व्यक्तीच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि व्हिडिओ मजेदार नसल्याचे सांगितले आहे. "इन्स्टाग्राम कृपया हे रील काढून टाका. ही हसण्याची बाब नाही!!" तिने दिल्ली पोलिस आणि राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा - TikTok Star Arrested: सोशल मिडीयाच्या 'त्या' पोस्टमुळे टिकटॉक स्टारमध्ये जुंपली, पोलिसांकडून टिकटॉक स्टारसह साथिदारांना अटक)
Women Harassed by Alstravage’s Fans
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)