महाराष्ट्रातील भिवंडी येथून एका धोकादायक बाइक स्टंटचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक मुलगी मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली दिसत आहे आणि दुचाकीस्वार हायवेवर धावणाऱ्या इतर वाहनांना ओव्हरटेक करताना पुढे जात आहे. पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तरुणाने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, असा व्हिडीओ शूट होत असल्याचे पाहून स्टंट करणारा दुचाकीस्वार थांबतो आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला धमकावतो. त्याला धमक्या दिल्याचीही व्हिडीओमध्ये दिसत आहे. आता हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दुचाकीस्वार आणि तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये मुलगा पल्सर बाइक चालवत आहे. झुबेर शब्बीर मोमीन असे त्याचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)