Viral Video: रस्त्यावर वाढदिवस साजरा करणं तरुणांना पडलं महागात; कचरा पाहून पोलिसांनी साफ करून घेतला रस्ता; यूजर्स म्हणाले, हा वाढदिवस कधीच विसरणार नाही, Watch Video

या तरुणांनी वाढदिवस साजरा करून रस्त्यावर केकची नासाडी केली. हा सर्व प्रकार पाहून तेथील पोलिसांना राग अनावर झाला आणि त्यांनी या तरुणांकडून रस्त्यावरील विखूरलेला केक व इतर कचरा साफ करून घेतला.

पोलिसांनी रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांकडून रस्ता साफ करून घेतला (PC - Twitter)

Viral Video: राजधानी लखनऊच्या 1090 चौकातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ३-४ मुलं रस्त्यावर विखुरलेला केक साफ करताना दिसत आहेत. या तरुणांनी वाढदिवस साजरा करून रस्त्यावर केकची नासाडी केली. हा सर्व प्रकार पाहून तेथील पोलिसांना राग अनावर झाला आणि त्यांनी या तरुणांकडून रस्त्यावरील विखूरलेला केक व इतर कचरा साफ करून घेतला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, 3-4 तरुण बर्थडे सेलिब्रेटी करण्यासाठी 1090 क्रॉसरोडवर आले. या तरुणांनी केक कापून जल्लोष साजरा केला. यानंतर केक रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहताच गौतमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात असलेले निरीक्षक सुधीर अवस्थी तेथे पोहोचले. इन्स्पेक्टर तरुणांना खडसावत म्हणाले की, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. त्यांनी तरुणांना रस्ता स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. तरुणांनीही आपली चूक मान्य करत रस्ता साफ केला. सुधीर अवस्थी यांनी युवकांना सूचना देत यापुढे कोणत्याही चौकात अशा पद्धतीने वाढदिवस साजरे करू नका, अशा सूचना दिल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now