Tata Punch EV Bonnet Useful To Hide 'Liquor': टाटा पंच ईव्ही बोनेटमधील जागेचा हटके वापर, व्हिडिओ व्हायरल, पोलीस कारवाईची शक्यता

व्हिडिओमध्ये एक तरुण टाटा पंच EV च्या बोनेटच्या खाली लपलेली जागा दाखवतो. गाडीचे बोनेट उचलून तो सांगतो की, विशेषत: कारची चार्जिंग केबल साठवण्यासाठी वापरली जाते ती जागा मद्या सारख्या इतर वस्तू सावधपणे ठेवण्यासाठी सहजपणे बदलता येऊ शकते. सदर रिल्सवर पोलीसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

टाटा पंच EV मधील "सिक्रेट फ्रंक स्पेस" सोशल मीडियावर भलत्याच कारणासाठी व्हायरल झाली आहे. एका व्हायरल झालेल्या इंस्टाग्राम रीलमध्ये एका तरुणाने दावा केला आहे की, तुम्ही प्रवास करत असताना दारुची बाटली सोबत बाळगली असेल आणि तुम्हाला पोलीस कारवाई करतील ही भीती असेल तर घाबरू नका. टाटा पंच ईव्हीमधील या जागेचा तुम्ही खुबीने वापर करु शकता. व्हिडिओमध्ये एक तरुण टाटा पंच EV च्या बोनेटच्या खाली लपलेली जागा दाखवतो. गाडीचे बोनेट उचलून तो सांगतो की, विशेषत: कारची चार्जिंग केबल साठवण्यासाठी वापरली जाते ती जागा मद्या सारख्या इतर वस्तू सावधपणे ठेवण्यासाठी सहजपणे बदलता येऊ शकते. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा, Paytm FASTag: पेटीएम फास्टॅग निष्क्रिय करायची आणि नवीन घेण्याची पद्धत, जाणून घ्या)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Jagran HiTech (@jagranhitech)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now