Viral Video: नियंत्रण सुटल्याने कालव्यात कोसळली कार; हवालदाराने 'असे' वाचवले सात जणांचे प्राण, पहा व्हिडिओ

तेथून जात असलेले कॉन्स्टेबल श्रीनिवास यांनी तत्काळ प्रतिसाद देत कालव्यात उडी मारून कारचे दरवाजे उघडले आणि गाडीतील प्रवाशांची सुटका केली.

Car crashes into canal (PC- X/@TeluguScribe)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका कार अपघाताचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. नियंत्रण सुटल्याने ही कार कालव्यात कोसळली. मात्र, सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. प्राप्त माहितीनुसार, कोनासीमा-बेल्लामपुडी येथे कारचे नियंत्रण सुटून दुचाकीला धडक बसून ती कालव्यात कोसळली. तेथून जात असलेले कॉन्स्टेबल श्रीनिवास यांनी तत्काळ प्रतिसाद देत कालव्यात उडी मारून कारचे दरवाजे उघडले आणि गाडीतील प्रवाशांची सुटका केली.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)