Amruta Fadnavis New Song: उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रदर्शित, युट्युबवर मिळाले लाखो व्ह्यूज (Watch)
‘मीट ब्रदर्स’सोबत या गाण्याचा टीझर रिलीज करताना, अमृता यांनी दावा केला होता की हे वर्षातील सर्वात मोठे ‘बॅचलोरेट’ गाणे असेल.
अमृता फडणवीस यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असण्यासोबतच त्या एक कलाकारही आहेत. त्या अनेकदा स्वतःची ओळख बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून करून देतात. सध्या त्या त्यांच्या एका गाण्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच अमृता फडणवीस यांचे एक गाणे रिलीज झाले आहे. अमृता फडणवीस यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत गाणी गायली आहेत. पण आज त्यांचे पंजाबीमधील गाणे प्रदर्शित झाले आहे.
‘मीट ब्रदर्स’सोबत या गाण्याचा टीझर रिलीज करताना, अमृता यांनी दावा केला होता की हे वर्षातील सर्वात मोठे ‘बॅचलोरेट’ गाणे असेल. आता हे गाणे रिलीज झाल्यानंतर काही तासांतच याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहतेही कमेंट करून गाण्याचे कौतुक करत आहेत. हे गाणे रिलीज झाल्यापासून अमृता यांचा लूक, आवाज आणि डान्सची सर्वत्र चर्चा होत आहे. अमृता फडणवीस यांचे टी-सीरीजचे 'मूड बना लिया' हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. मीट ब्रदर्ससोबत अमृता फडणवीस यांनीही गाण्यात आवाज दिला आहे.
अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे-
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2023 11:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

