Man Rams Speeding Car Into Chiplun Hotel: पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने तरुणाने हॉटेलमध्ये घुसवली कार; घटना CCTV मध्ये कैद
हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Man Rams Speeding Car Into Chiplun Hotel: रत्नागिरीतील चिपळूण (Chiplun) मध्ये पिण्याच्या पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने एका कार चालकाने हॉटेलमध्ये कार घुसवण्याचा प्रयत्न केला. चिपळूणमधील ओमी किचन हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये घुसून बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे नुकसान करताना दिसत आहे. सुदैवाने हॉटेलमधील सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही हानी झाली नाही. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अद्याप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
येथे पहा व्हिडिओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)