Uttar Pradesh: हाय टेंशन लाईनची वायर अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद, पहा व्हिडिओ
तरुणाच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी विद्युत कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून संतप्त लोकांना शांत केले.
Uttar Pradesh: अलिगढमधील अक्राबाद पोलिस स्टेशन हद्दीतील कसबा कौडीगंजजवळ तरुणाच्या अंगावर हाय टेंशन लाईनची वायर पडली. यात या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी विद्युत कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून संतप्त लोकांना शांत केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. विद्युत विभागावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)