Pune Truck Accident: बुधवार पेठेतील पोस्ट ऑफिसच्या आवारात रस्त्याला भगदाड; पुणे महानगरपालिकेचा ट्रकचं गेला खड्ड्यात, पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
चालकाने वाहनातून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Pune Tanker Fell In Pit: पुण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील बुधवार पेठ (Budhwar Peth) येथील पोस्ट ऑफिस परिसरात एक ट्रक पलटी होऊन चक्क खड्ड्यात पडला. व्हिडिओमध्ये ट्रकचा मागचा भाग खड्ड्यात पडताना दिसत असून त्यानंतर काही सेकंदातचं संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेल्याचं दिसतं. प्राप्त माहितीनुसार, हा ट्रक पुणे महापालिकेचा असून तो नाला साफसफाईच्या कामासाठी तेथे गेला होता. चालकाने वाहनातून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे अग्निशमन दलाला दुपारी 4:15 च्या सुमारास या घटनेसंदर्भात कॉल आला, त्यानंतर अग्निशमन विभागाचे 20 कर्मचारी आणि पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. खड्ड्यातून ट्रक बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
पुणे महानगरपालिकेचा ट्रक पडला खड्ड्यात, पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)