Snake Viral Video: पाठीवर दप्तर अडकवून चिमुरडी पोहोचली शाळेत; वर्गात गेल्यावर बॅग उघडताचं निघाला विषारी नाग, पहा व्हिडिओ
दहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी खांद्यावर बॅग घेऊन रोजच्या प्रमाणे शाळेत पोहोचली आणि जेव्हा तिने वर्गात तिची बॅग उघडली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. एक साप तिच्या पिशवीत फणा काढून बसला होता.
Snake Viral Video: साप हा एवढा धोकादायक प्राणी आहे. साप इतके विषारी असतात की त्यांच्या दंशाने माणूस पाणीही मागत नाही. पावसाळ्यात नागरी भागात अनेकदा साप दिसतात. कारण या दिवसात त्यांच्या बिलामध्ये पाणी भरलेले असते, त्यामुळे ते अनेकदा इकडे-तिकडे फिरताना दिसतात. असाच एक साप विद्यार्थिनीच्या शाळेच्या बॅगेत सापडल्याने शाळेत खळबळ उडाली आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील असून एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी खांद्यावर बॅग घेऊन रोजच्या प्रमाणे शाळेत पोहोचली आणि जेव्हा तिने वर्गात तिची बॅग उघडली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. एक साप तिच्या पिशवीत फणा काढून बसला होता. सापाला पाहून सर्व मुलांनी जोरजोरात आरडाओरडा केला आणि संपूर्ण शाळेत गोंधळ उडाला. त्यानंतर एका शिक्षिकेने शौर्य आणि समजूतदारपणा दाखवत विद्यार्थिनीकडून तिची स्कूल बॅग हिसकावून घेतली.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की, शाळेतील एका शिक्षकाने अतिशय हुशारीने विद्यार्थिनीची बॅग हिसकावून ती जमिनीवर पालथी केली. या बॅगेतून एक मोठा नाग बाहेर येताना दिसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिशवीतून बाहेर पडलेल्या नागाची लांबी सुमारे 4 ते 5 फूट होती. तज्ज्ञांच्या मते हा काळा नाग विषारी प्रकारचा होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)