Viral Video: स्कूटरवर बसलेल्या व्यक्तीला आला हृदयविकाराचा झटका; SI बनला देवदूत, CPR देऊन वाचवला जीव, पाहा व्हिडिओ

देवरियाच्या पोलीस लाईनजवळील स्टेडियमबाहेर ही घटना घडली आहे.

स्कूटरवर बसलेल्या व्यक्तीला आला हृदयविकाराचा झटका (फोटो सौजन्य - X/@shalabhmani)

Viral Video: दिवसेंदिवस हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्याने अनेकांचा जीव वाचतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात पाहायला मिळाला. जिथे, शनिवारी सकाळी एका उपनिरीक्षकाने (एसआय) आपल्या प्रसंगावधानाने एका व्यक्तीचे प्राण वाचवले. दरम्यान, एसआय विनोद कुमार सिंह देवदूताच्या रूपात तेथे पोहोचले आणि त्यांनी सीपीआर देऊन त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. देवरियाच्या पोलीस लाईनजवळील स्टेडियमबाहेर ही घटना घडली आहे.

स्कूटरवर बसलेल्या व्यक्तीला आला हृदयविकाराचा झटका, पहा व्हिडिओ - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)