Pani Puri Cake: महिलेने बनवला पाणीपुरी केक; संतप्त नेटिझन्स म्हणाले, 'देव कधीच माफ करणार नाही' (Watch Video)
इंस्टाग्राम रीलमध्ये, महिला व्लॉगर या विचित्र केकचे विविध स्तर तयार करताना दिसत आहे. यात तिने केकमध्ये पाणीपुरीचे पाणी, शेव, चिंच पाणी, क्रिम याचा वापर केला आहे. हा केक पाहून काही नेटीझन्सनी संताप व्यक्त केला असून 'देव कधीच माफ करणार नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Pani Puri Cake: आपल्यापैकी अनेकांना सोशल मीडियावर केक बनवण्याचे व्हिडिओ पाहायला आवडतात. हे व्हिडिओज पाहून ते याप्रमाणे कृती करून नव-नवीन केक बनवत असतात. नुकताच केक बनवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका फूड व्लॉगरला पाणीपुरी केक (Pani Puri Cake) बनवल्याने तिला नेटीझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले. इंस्टाग्राम रीलमध्ये, महिला व्लॉगर या विचित्र केकचे विविध स्तर तयार करताना दिसत आहे. यात तिने केकमध्ये पाणीपुरीचे पाणी, शेव, चिंच पाणी, क्रिम याचा वापर केला आहे. हा केक पाहून काही नेटीझन्सनी संताप व्यक्त केला असून 'देव कधीच माफ करणार नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दुसऱ्या एका यूजर्सने म्हटलं आहे, 'ज्याच्यासाठी केक बनवला आहे, तो जिंवत आहे ना?' (हेही वाचा - Misal Pizza Recipe: तुम्ही कधी 'मिसळ पिझ्झा' खाल्ला आहे का? नाही... तर पहा सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होणारा 'हा' व्हिडिओ)
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)