Viral Video: चालत्या रोडवेज बसमध्ये अतिशय धक्कादायक पद्धतीने चढली मुलगी; मुलीचं जुगाड पाहून तुम्हीही लावालं डोक्याला हात, पाहा व्हिडिओ

एक तरुणी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तिला जागा मिळत नाही तेव्हा ती खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Video: चालत्या रोडवेज बसमध्ये अतिशय धक्कादायक पद्धतीने चढली मुलगी; मुलीचं जुगाड पाहून तुम्हीही लावालं डोक्याला हात, पाहा व्हिडिओ
Girl boarded a moving bus Viral Video (PC - Twitter)

Viral Video: चालत्या बस किंवा ट्रेनमध्ये चढण्याच्या बाबतीत भारतीयांशी कोणीही स्पर्धा करु शकत नाही. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तथापि, असं करणं खूप धोकादायक आहे. हे स्टंट अनेकदा जीवावर बेतण्याची भीती असेत. अनेकदा लोक बस आणि ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत असतात. असाचं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुणी अशा प्रकारे बसमध्ये चढताना दिसत आहे की बघणारेही थक्क झाले आहेत. ही तरुणी खिडकीतून बसमध्ये घुसताना दिसत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे की, हरियाणा रोडवेजची बस हळूहळू पुढे जाऊ लागली आहे. बसचे मागील व पुढील दरवाजे प्रवाशांनी भरलेले असतात. अशा स्थितीत प्रवाशांना तेथून चढणे अवघड होऊन बसते. दरम्यान, एक तरुणी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तिला जागा मिळत नाही तेव्हा ती खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2023 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).