Viral Video: उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या परिसरात कुत्र्यांच्या टोळीने तरुणावर केला हल्ला, तरुणाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद Watch

मिळालेल्या माहितीनुसार, कुत्रा चावल्याची ही संपूर्ण घटना AMU कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Dogs attacked on young man (PC - Twitter)

Viral Video: उत्तर प्रदेशच्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठात फिरणाऱ्या तरुणाला कॅम्पसमध्ये 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी चावा घेत जखमी केलं. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सफदर अली असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, कुत्रा चावल्याची ही संपूर्ण घटना AMU कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, सिव्हिल लाइनमध्ये राहणारा सफदर अली रविवारी सकाळी 7.30 वाजता एएमयू कॅम्पसमध्ये फिरत होता. त्यानंतर 10 ते 12 कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. (हेही वाचा - Pitbull Dog माणसाच्या प्रायव्हेट पार्टला चावला, रागाच्या भरात लोकांची त्याला बेदम मारहाण)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement