Chandigarh Shocker: अंबाला येथे बिबट्याने 4 वर्षाच्या मुलाला नेले उचलून; हल्ल्यात मानेवर गंभीर जखमा (Watch Video)
अंबाला जिल्ह्यातील सुरगळ गावातून शेजारी असलेल्या थरवा गावात आईसोबत चालत चाललेल्या 4 वर्षीय मुलावर रविवारी सायंकाळी बिबट्याने हल्ला केला. त्यात मुलाच्या मानेवर जखमा झाल्या.
Chandigarh Shocker: अंबाला जिल्ह्यातील सुरगळ गावातून शेजारी असलेल्या थरवा गावात आईसोबत चालत चाललेल्या 4 वर्षीय मुलावर(Kid) रविवारी सायंकाळी बिबट्याने हल्ला (Leopard Attack)केला. त्यात मुलाच्या मानेवर जखमा झाल्या. दिपांशू असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर चंदीगड येथील सेक्टर 32 येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेवेळी महिलेच्या कडेवर आणखी एक मुल होते. डोक्यावर पीठाचे पोते होते आणि लहान मुलगा आईच्या पुढे चालला होता. दीपांशुची आई रजनी यांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी 5 वाजता, पिठाच्या गिरणीतून घरी जात असताना बिबट्याने अचानक काही अंतरावर असलेल्या दीपांशूला उचलून नेलं. बिबट्या आकाराने खूप मोठा होता. मदतीसाठी आरडाओरडा केला असता गावकरी जमा झाले. त्यांनी बिबट्याला पळवून लावले.
व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement