चार महिन्यांसाठी भारत भेटीवर आलेला रशियन Miron रमला सिंधुदुर्गच्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत! (Watch Video)
मराठीची गोडी लागलेल्या मिरॉनला भविष्यात भारतात यायला मिळाल्यास पुन्हा यायला आवडेल असं तो म्हणाला आहे.
महाराष्ट्रात अनेकजणांना आता मराठी माध्यमात शिकल्याने आपण स्पर्धात्मक युगात मागे पडत असल्याची भावना आहे. पण रशिया हून आलेला 11 वर्षीय मिरॉन मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत रमला आहे. त्याने अल्पावधीतच काही मराठमोळे शब्द आत्मसाद केले आहेत. मराठमोळी खाद्यसंस्कृती त्याला रूचली असल्याचं म्हटलं आहे. आजगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेने देखील त्याला प्रवेश दिला असून इतर मुलांसोबत मिरॉन भारतात शालेय जीवनाचा आनंद लूटत आहे.
'मिरॉन' ला मराठीचं वेड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)