Chandigarh Dog Attack: भटक्या कुत्र्यांने पाठलाग केल्याने 10 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, (Watch Video)
मुलीचे वडील हरदेव सिंग तिला मणिमाजरा रुग्णालयात घेऊन गेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जसमीत ही वाटिका पब्लिक स्कूल, सेक्टर 19, चंदीगडचा इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थीनी होती.
Chandigarh Dog Attack: चंदीगडमधील मणि माजरा परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्यानात खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला अचानक भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. भटक्या कुत्र्यांने पाठलाग केल्याने 10 वर्षीय मूक मुलीला हृदयविकाराचा झटका आला. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जसमीत असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता 2 मधील विद्यार्थिनी होती. कुत्र्यांनी तिचा पाठलाग सुरू केल्यानंतर मुलगी इतकी घाबरली होती की तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मुलीचे वडील हरदेव सिंग तिला मणिमाजरा रुग्णालयात घेऊन गेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जसमीत ही वाटिका पब्लिक स्कूल, सेक्टर 19, चंदीगडचा इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थीनी होती. ही घटना 16 डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - Dog Attack in Hyderabad Video: अपार्टमेंटच्या बाहेर भटक्या कुत्र्याचा 5 वर्षीय मुलावर हल्ला, चिमुरडा जखमी; (Watch Video))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)