Mira Road: काशिमिरा येथे मेट्रो स्टेशनचा काही भाग पडल्याने तरुणाच्या डोक्याला दुखापत; X वापरकर्त्याने MMRDA वर केला सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप (Watch Video)
व्हिडिओमध्ये तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा तुकडा पडल्याने त्याला रक्तस्त्राव झाल्याचं दिसत आहे.
Mira Road: मीरा रोड येथील काशिमिरा मेट्रो स्टेशनचा काही भाग पडल्याने तरुणाच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. एका X वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून त्याने एमएमआरडीएने सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा तुकडा पडल्याने त्याला रक्तस्त्राव झाल्याचं दिसत आहे. @AASKTOYOU या वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, 'ही घटना घडली काशिमीरा मीरा रोड येथे अमर पॅलेस मेट्रो स्टेशन जवळ MMRDA मध्ये मेट्रोचे काम चालू आहे. पण याठिकाणी लोकांच्या जीवाला धोका आहे. ही दुसरी घटना आहे. MMRDA कोणत्याही सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत आणि MBMC तसेच काशिमीरा पोलिस यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.'
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)