Pune Video: धरभाव ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला; RPF जवानाने वाचवला जीव

भरधाव ट्रेन पडताना एका तरुणाचा तोल जातो आणि तो रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकून पडतो

Pune Video viral PC TWitter

Pune Video: पुणे रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव ट्रेन पडताना एका तरुणाचा तोल जातो आणि तो रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकून पडतो. ट्रेनचा वेग जास्त असल्याने स्थानकावर प्रवाशी काही अंतरापर्यंत फरपटत येता. धक्कादायक घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. ही घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, धावती ट्रेन पकडण्याच्या नादात भीषण अपघात घडला असता.मात्र आरपीएक कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधाने प्रवाशाचा जीव वाचला आहे. हा थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शौर्यांने तरूणाचा जीव वाचवल्याने सोशल मीडियावर आरपीएफ कर्मचाऱ्याचे कौतुक केले जात आहे. (हेही वाचा- तिकिटवरून महिला प्रवाशासोबत मारामारी झाल्याने कंडक्टर निलंबित

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)