Pune Engineer Stealing Video: पुण्यात महिला इंजिनिअरने फोनिक्स मॉलमधून चोरले सोन्याचे ब्रेसलेट; आरोपी महिलेला अटक, पहा व्हिडिओ

मॉलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या महिला अभियंतीला अटक केली आहे. अनु वेद प्रकाश शर्मा असं या आरोपी महिला इंजिनिअरचं नाव आहे.

Woman engineer steals gold bracelet (PC - You Tube)

Pune Engineer Stealing Video: पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका हाय-प्रोफाइल आयटी महिला अभियंतीला 5 मार्च रोजी पुण्यातील फोनिक्स मॉलमध्ये सोन्याचे ब्रेसलेट चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे मिररने वृत्त दिले आहे. फोनिक्स मॉलमधील ब्लू स्टोन शॉपमधून सोन्याचे ब्रेसलेट चोरताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. मॉलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या महिला अभियंतीला अटक केली आहे. अनु वेद प्रकाश शर्मा असं या आरोपी महिला इंजिनिअरचं नाव आहे. 31 वर्षीय अनुने गेल्या वर्षी जून महिन्यात फीनिक्समध्ये अशीच चोरी केल्याची कबुली दिली आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now