Window Seat Cushion Missing In IndiGo Flight: इंडिगो पुणे-नागपूर फ्लाइटमध्ये विंडो सीटचे कुशन गहाळ, See Photo

नागपूरच्या रहिवासी सागरिका पटनायक यांना विमानात तिची अर्धी सीट गहाळ झाल्याचे आढळले. सागरिका रविवारी पहाटे पुण्याहून नागपूरला (6E-6798) इंडिगोच्या फ्लाइटने कामासाठी जात होती.

Window Seat Cushion Missing In IndiGo Flight (PC - Twitter)

Window Seat Cushion Missing In IndiGo Flight: आतापर्यंत तुम्ही विमानात सामान गहाळ झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. परंतु, नागपूरच्या रहिवासी सागरिका पटनायक यांना विमानात तिची अर्धी सीट गहाळ झाल्याचे आढळले. सागरिका रविवारी पहाटे पुण्याहून नागपूरला (6E-6798) इंडिगोच्या फ्लाइटने कामासाठी जात होती. तिचे पती, सुब्रत पटनायक यांनी TOI ला सांगितले की, एअरलाइनने सागरिकाला खिडकीच्या बाजूचे सीट क्रमांक 10A दिले. पंरतु, जेव्हा ती सीटजवळ गेली तेव्हा तिला तिचं सीटवरील कुशन गहाळ असल्याचं दिसलं. सध्या या सीटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Woman Harassed In INDIGO Flight: इंडीगो फ्लाईटमध्ये महिलेचा लैंगिक छळ, मुंबई-गुवाहाटी विमान प्रवासादरम्यान विनयभंगाच्या घटनेची पुनरावृत्ती)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement