Wife Earns More Than Man: बायको नवऱ्यापेक्षा अधिक कमावते, कोर्टाने फेटाळला महिलेचा भरणपोषण अर्ज

महिलेचा भरणपोषणाचा अर्ज फेटाळून लावताना कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीकडून भरणपोषणाची रक्कम मागणाऱ्या महिलेचे उत्पन्न हे तिच्या पतीपेक्षा अधिक आहे.

Court (Image - Pixabay)

ट्रायल कोर्टाने मुंबईतील ताडदेव येथील एका 36 वर्षीय महिलेला पतीकडून भरणपोषण मिळवून द्यायला नकार दिला आहे. महिलेचा भरणपोषणाचा अर्ज फेटाळून लावताना कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीकडून भरणपोषणाची रक्कम मागणाऱ्या महिलेचे उत्पन्न हे तिच्या पतीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वार्षीक चार लाख रुपये पतीने भरणपोषणासाठी द्यावेत ही मागणी योग्य नाही. त्यामुळे पतीकडून भरणपोषण घेण्यासाठी महिला पात्र नाही.

महिलेने सन 2021 मध्ये पती आणि सासरच्या मंडळींविरोधा घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. महिलेने आरोप केला होता की, अपत्यप्राप्ती झाल्यानंतर पतीकडील कुटुंबीयांनी तिला घर सोडून जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे पतीने सदर महिला आणि मुलासाठी प्रतिमहिना 10,000 रुपयांपेक्षा अधिक मदत करावी.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)