Weather Update Tomorrow: कोकणात मुसळधार पाऊस; रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा बरसणार; जाणून घ्या उद्याचे हवामान
भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकारी के एस होसालीकर यांनी दिलेल्या माहितीनसार येत्या 9 ते 11 जून या कालावधीत कोकणातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा दमदार बरसणार आहे.
मान्सून यंदाच्या वर्षी वेळेच्या काहीसा आधीच महाराष्ट्रात दाखल झाला. त्यामुळे उन्हाळा संपून पावसाळाही लवकर सुरु झाला. नाही म्हणायला मान्सूनपूर्व पावसाची कामगिरीही समाधानकारक राहिली. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननेही जोरदार हजेरी लावली. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. उद्याचे हवामान सुद्धा पावसासाठी पोषख आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकारी के एस होसालीकर यांनी दिलेल्या माहितीनसार येत्या 9 ते 11 जून या कालावधीत कोकणातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा दमदार बरसणार आहे.
एक्स पोस्ट
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)