Water Levels in Mumbai Catchment Area: मुंबई धरणक्षेत्रात पाणीसाठा 25% पर्यंत; येत्या मुसळधार पावसात अजून वाढीची शक्यता
येत्या काही आठवड्यात असाच जोरदार पाऊस बरसत राहण्याचा अंदाज असल्याने हा पाणीसाठा 40-45% पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई मध्ये यंदा कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे पाणीसाठ्याने तळ गाठला होता. विक्रमी निच्चाकांवर यंदा पाणीसाठा पोहचल्यानंतर बीएमसीने पाणी कपात जाहीर केली आहे. पण आता जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसत असल्याने पाणी साठ्यात वाढ होताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, आज 13 जुलै पर्यंत मुंबईचा पाणीसाठा 25% पर्यंत आला आहे. तर येत्या काही आठवड्यात असाच जोरदार पाऊस बरसत राहण्याचा अंदाज असल्याने हा पाणीसाठा 40-45% पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)