Watch: सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत Abdul Sattar यांनी व्यक्त केला खेद, दिले 'हे' स्पष्टीकरण
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला होता.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्र्यांवर चहूबाजूंनी टीका व्हायला सुरुवात झाली होती. आता अब्दुल सत्तार यांनी याबाबत माफी मागितली आहे. ते म्हणाले, 'मी कोणत्याही महिला-भगिनीबाबत अपशब्द बोललो नाही. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत त्यांच्याबद्दल मी बोललो. महिलांचे मन दुखावेल असा कोणताही शब्द मी बोललो नाही. परंतु कोणाची मने दुखावली असतील तर मी खेद व्यक्त करतो. महिलांचा सन्मान करणारा मी कार्यकर्ता आहे.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)