Wagh Nakh: अखेर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली; पहा पहिली झलक (See Photo)
व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून वाघनखे आणली असून, ही शिवकालीन वाघनखे संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार आहेत.
Wagh Nakh: अखेर आज, 19 जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष आकर्षणासह, शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन दालनाचे उदघाटन पारे पडले. त्यानंतर वाघनखांची पहिली झलक समोर आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. वाघनखां'च्या प्रदर्शनार्थ सातारा येथे त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. उद्यापासून ही वाघनखे जनतेसाठी पाहण्यासाठी खुली होणार वाहेत.
व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून वाघनखे आणली असून, ही शिवकालीन वाघनखे संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार आहेत. वाघनखाच्या संरक्षणाकरीता सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सार त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. दररोज सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इतर प्रेक्षकांना 10 रुपये प्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत वाघनखे पाहण्यास खुले राहणार आहे. (हेही वाचा: Gadchiroli: संपूर्ण उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त मुक्त; पोलिसांची माहिती)
पहा पोस्ट-
🚩 छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे ऐतिहासिक 'वाघनखां'च्या विशेष आकर्षणासह, शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन दालनाचे उदघाटन.@mieknathshinde @AjitPawarSpeaks @SMungantiwar @Chh_Udayanraje @shambhurajdesai#शिवरायांची_वाघनखे pic.twitter.com/vfkdGNMivR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 19, 2024
|| शिवशस्त्रशौर्यगाथा ||
Historic moment ! ऐतिहासिक क्षण !
🕑 2pm | 19-7-2024📍Satara | दु. २ वा. | १९-७-२०२४ 📍सातारा.
🚩 Inauguration of an exhibition hall showcasing legendary weapons and the historical 'Waghnakhe' at Chhatrapati Shivaji Maharaj Museum, Satara.… pic.twitter.com/7MaMWOIlMo
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2024 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

