Viral Video Fact Check: रोख देणगी गोळा केल्याचा व्हिडिओ Shirdi Sai Baba मंदिरातील नसून, बांगलादेशच्या मशिदीमधील; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओची सत्यता
मात्र जेव्हा अशा व्हिडीओची सत्यता तपासली गेली तेव्हा हे व्हिडीओ शिर्डीच्या सी मंदिरातील नसल्याचे समोर आले आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात मिळालेल्या देणग्या मशिदीत पाठवल्या जात असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दान केलेले पैसे कथितपणे मशिदीत जात असल्याचा दावा ट्विटरवर शेअर केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये करण्यात आला आहे. अनेक वापरकर्त्यांनी असे व्हिडिओ शेअर केले आहेत आणि आरोप केला की हिंदूंनी दान केलेले पैसे इतरत्र जात आहेत. व्हिडीओ शेअर करताना. ‘शिर्डी साईंच्या खिशात टाकलेला हिंदूंचा पैसा कुठे जातोय ते तुम्हीच बघा.’ असे शीर्षक लिहिले आहेत. मात्र जेव्हा अशा व्हिडीओची सत्यता तपासली गेली तेव्हा हे व्हिडीओ शिर्डीच्या सी मंदिरातील नसल्याचे समोर आले आहे.
सत्य हे आहे की हे व्हिडीओ बांगलादेशातील मशिदीमधील आहेत. व्हायरल होत असलेले व्हिडिओ एक महिना जुने असून ते बांगलादेशातील किशोरगंज शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मूळ व्हिडिओमध्ये पगला मस्जिद नावाच्या मशिदीचे प्रतिनिधी देणग्या गोळा करताना दिसत आहेत. व्हिडिओ जसजसा पुढे सरकतो, तसतसे मुले आणि प्रौढ मशिदीला मिळालेल्या देणगीचे पैसे मोजताना दिसतात. ‘पगला मशिदीच्या दानपेटीत विक्रमी 5.5 दशलक्ष मिळाले’, अशा मूळ व्हिडिओचे शीर्षक आहे. या व्हिडिओ मध्ये दिसत असलेले पैसे हे भारतीय रुपये नसून, ते बांगलादेशचे चलन ‘टका’ असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Viral video: इंदापूरच्या शेतकर्याचा गजब थाट; 'थार' ला नांगर जोडून नांगरणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)