Darshana Pawar Last Speech: दर्शना पवारच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; म्हणाली, 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते...' (Watch Video)

दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. आता दर्शनाच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Darshana Pawar (PC - Twitter)

Darshana Pawar Last Speech: राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मृतावस्थेत सापडलेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. दर्शनाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती. आता दर्शनाच्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दर्शनाने सांगितलं आहे की, 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे. ती स्टोरी ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येते. जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते.' (वाचा - MPSC च्या परीक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवार चा राजगडाच्या पायथ्याशी आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; पुण्यात खळबळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)