मुंबई मधून सुटणार्या शिर्डी, सोलापूर च्या Vande Bharat ट्रेन्सच्या थांब्यामध्ये बदल; पहा नवं वेळापत्रक
मुंबई वरून सुटणार्या सोलापूर आणि शिर्डी च्या वंदे भारत च्या वेळापत्रकातील बदल 4 ऑगस्ट पासून लागू केले जाणार आहे.
मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स वरून सुटणार्या शिर्डी आणि सोलापूरकडे जाणार्या वंदे भारत ट्रेन्सच्य थांब्यात आता प्रत्येकी एका थांब्याची वाढ करण्यात आली आहे. सीएसएमटी -शिर्डी ही वंदे भारत एक्सप्रेस कल्याण स्थानकातही थांबेल तर सीएसएमटी- सोलापूर ही वंदे भारत एक्सप्रेस ठाणे स्थानकातही थांबणार असल्याचं मध्य रेल्वे कडून जाहीर करण्यात आले आहे. 4 ऑगस्ट पासून हे बदल करण्यात येणार आहे. Surekha Yadav Drives Vande Bharat: आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्या हातात आज सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस चं सारथ्य (See Photos) .
पहा वंदे भारतचं वेळापत्रक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)