MNS Vandalizes Wagholi's JSPM School: वाघोलीतील जेएसपीएम शाळेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड; फी वसुलीसाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट नाकारल्याने करण्यात आला निषेध (Watch Video)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी शाळेत तोडफोड करत दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याचा निषेध केला.
MNS Vandalizes Wagholi's JSPM School: वाघोली येथील जेएसपीएम शाळेत (Wagholi's JSPM School) तोडफोडीची घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी शाळेत तोडफोड करत दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याचा निषेध केला. वाघोलीतील मनसे पक्षाचे प्रतिनिधी प्रकाश जमधाडे यांनी दिलेल्या अतिरिक्त माहितीनुसार, शाळेने विद्यार्थ्याला परीक्षेचे हॉल तिकीट देण्यास नकार दिल्यामुळे जेएसपीएम स्कूलमधील विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला. मनसे पक्षाने या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. (वाचा - Raj Thackeray On EC: शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये; राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा)
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)