Uddhav Thackeray on Maharashtra Bandha: उद्याचा महाराष्ट्र बंद मागे, मात्र MVA तोंडाला काळ्या फिती लावून करणार निषेध; उद्धव ठाकरेंची माहिती (Watch Video)

उद्या महाराष्ट्रातील शहरातील-गावातील मुख्य चौकात विरोधी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते, तोंडाला काळ्या फिती लावून व हातात काळे झ्नेडे घेऊन या सर्वाचा निषेध करतील.

Uddhav Thackeray | (Photo Credits: X)

Uddhav Thackeray on Maharashtra Bandha: महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेवरून महाविकास आघाडीने (MVA) उद्या, 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, जी आता मागे घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि त्यानंतर शरद पवार यांच्या आवाहनानंतर, महाविकास आघाडीने हा बंद मागे घेतल्याचे समजते. याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'संप हा लोकशाहीचा अधिकार आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य नसून, केवळ न्यायालयाचा मान राखून आम्ही हा बंद मागे घेत आहोत. पण आम्ही थांबणार नाही.' ते पुढे म्हणाले, 'ज्या तत्परतेने न्यायालयाने या बंदबद्दल आदेश जारी केला, त्याच तत्परतेने त्यांनी गुन्हेगारांना शिक्षाही द्यावी.'

उद्याचा महाराष्ट्र बंद जरी मागे घेतला असला तरी, महाविकास आघाडी आपले आंदोलन चालूच ठेवणार आहे. उद्या महाराष्ट्रातील शहरातील-गावातील मुख्य चौकात विरोधी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते, तोंडाला काळ्या फिती लावून व हातात काळे झ्नेडे घेऊन या सर्वाचा निषेध करतील. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे उद्या सकाळी 11 वा. मुंबईतील शिवसेना भवनासमोरील जंक्शनवर तोंडाला काळी फीत बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन बसणार आहेत. (हेही वाचा: Sharad Pawar on Maharashtra Bandh: उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे शरद पवार यांचे आवाहन; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घेतला निर्णय)

महाविकास आघाडीचे नेते-कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून करणार निषेध-