Uddhav Thackeray: बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे कुठे होते, भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं, उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका
बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक दावा केल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. बाबरी जेव्हा पाडली त्यावेळी हे लोक कुठे होते असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बाबरी पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात लपले होते. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)